कृष्णाई देणार निराधारांना मायेचा ओलावा, रक्तदान शिबीरास भरभरून प्रतिसाद

59

इंदापूर येथे कृष्णाई सोशल फाउंडेशन नावाची सामाजिक संस्था उभी राहत आहे. निराधार आणि बेवारस तसेच वृद्ध लोकांना मायेचा आधार देण्याचं काम कृष्णाई शोषल फाऊंडेशनच्या माध्यामातून करण्यात येणार आहे. संस्थेचा भुमीपुजन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 567 लोकांनी रक्तगट तपासणी करून घेतली तर अनेकांनी रक्तदान केलं. रक्तदान शिबीरास भरभरून प्रतिसाद मिळाला.

देशासह राज्यात कोरोनाचा फ़ैलाव सुरू आहे. अशातच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करावीत, अस आवाहन करण्यात येत आहे. याच उद्देशाने कृष्णाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद नरुटे, संस्थापक उपाध्यक्ष शुभम ताटे, संस्थापक सचिव विजय झगडे यांनी हवामानाचा अंदाज घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं, याला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी अक्षय ब्लड बँक हडपसर येथील डॉ. अभिजित अहिरकर, डॉ. रुपेश दरेकर, डॉ. प्रशांत शिगवण, डॉ. सागर लोहकरे, डॉ. समाधान मानेदेशमुख यांनी उपस्थित राहून, नियोजन बंध रक्तदान शिबिर पार पाडले. यावेळी कृष्णाई कमिटीच्या वतीने राक्तदात्यांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.