केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

25

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झाल्याची धक्कादाय बातमी आहे.दिल्लीतील एका हाॅस्पीटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे सुपूत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

रामविलास पासवान यांना राजकारणतील हवामान तज्ञ म्हणून ओळखले जाते. निवडणूक राजकारणात हवा कोणत्या बाजूने आहे हे ओळखण्यात ते पटाईत होते. त्यांच्या याच कसबामुळे ते युपीए सरकारमध्ये देखील मंत्री होते. तब्बल पाच दशकांचा राजकारणाचा अनूभव त्यांच्या पाठीशी होता.

पासवान यांच्या दुःखद निधनाने मोठी राजकिय पोकळी निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यावरांनी पासवान यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.