कॉंग्रेस नेते शशी थरुर यांनी का मागितली नरेंद्र मोदींची माफी

5

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेश दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान पंतप्रधानांनी बांग्लादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालो होतो असे विधान केले होते. यानंतर कॉंग्रेसकडून नरेंद्र मोदी खोटे बोलत असल्याचा दावा करण्यात आला असून त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रकार घडला. कॉंग्रेस नेते शशी थरुर यांनीसुद्धा याप्रकरणी ट्वीट करत मोदींवर टीका केली होती. मात्र त्यानंतर चुक लक्षात येताच शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली आहे.

बांग्लादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात मी सहभागी झालो होतो. त्यावेळी माझ्यावर तरुंगात जाण्याची वेळसुद्धा आली होती. असे विधान पंतप्रधानांनी केले होते. यावर मोदी बांग्लादेशमध्येसुद्धा खोटा प्रचार करत आहेत. बांग्लादेशला स्वातंत्र्य कुणि मिळवून दिले हे सगळ्यांनाच माहिती आहे. अशी टीका शशी थरुर यांनी केली होती.

परंतू काही वेळात आपली चुक लक्षात येताच चुकीची जाहीर कबुली करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली. काही बातम्यांचे मथळे आणि ट्वीटच्याआधारे मी हे वक्तव्य केले होते. ईंदिरा गांधीचा मोदींनी ऊल्लेख केला नाही असा त्याचा अर्थ होता.

मात्र नंतर मला कळाले की, त्यांनी ईंदिरा गांधींचा ऊल्लेख त्यावेळी केला आहे. त्यामुळे माझी चुक झाली आणि मी ती कबुल करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागतो. असे शशी थरुर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.