सिंधुदुर्गात होत असलेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प मंत्री अमित देशमुख लातूरला नेण्याची मागणी केल्याने काँग्रेस शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे
कोकणातील प्रकल्पावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा काडी पडल्याच दिसतंय. केंद्र सरकारचा प्रकल्प दोडा मार्गावरील आढाळी येथे उभारण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाने त्याला मंजुरीही दिली आहे. परंतु, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अचानक हा प्रकल्प लातूरला हलविण्याची मागणी केल्याने त्याला शिवसेना आक्रमक झाली आहे.
प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झालेत. असं म्हणत विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे.