कोरोनातून बरं होण्यासाठी मोदींनी दिल्या आवडत्या मित्राला शुभेच्छा

14

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. त्यानिमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना ची लागण झाल्याचं वृत्त आहे. स्वतः ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनाही कोरोनाची बाधा झालीय. त्यांनी स्वत: ला क्वारंटाइन केलंय. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानियादेखील क्वारंटाइन झाल्या आहेत.

ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येताच ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया गुरुवारी रात्री क्वारंटाइन झाले. होपला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांनीही करोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल समोर येताच ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्याला करोनाची लागण झाली असल्याचे सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना लागण झाल्याचे माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं “माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया लवकर बऱ्या व्हाव्यात. त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा”