कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना मुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच अनेक धार्मिक स्थळ कोरोनामुळें बंद आहेत. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होता. जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बार देखील, आणि काही प्रमाणात रेल्वे सुरु करण्यात आले आहेत. लवकरच सिनेमा गृह उघडली जाणार आहेत. त्यातच आता मंदिरं उघडण्याची मागणी होऊ लागली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केलं आहे. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिरात अनोखं आंदोलन करून मंदिरं खुली करण्याची मागणी केली आहे. कसबा मंदिराच्या सभा मंडपात होम हवन आणि गणपती बाप्पाच्या नामाचा जयघोष यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी केला. कोरोना पूर्णपणे गेला असं आपण म्हणू शकत नाही, पण राज्य सरकारने इतर गोष्टी सुरु केल्या आहेत. तसंच लवकर मंदिरं खुली करावी. कोरोना फक्त मंदीरातच लपून बसला आहे का? असा सवाल देखील यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी केला.