“कोरोना मुळे मुलगी मेली असती तर” जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी केलं धक्कादायक वक्तव्य

15

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेने देश हादरला आहे. हाथरस येथील पीडितेचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशात सध्या तणावाचं वातावरण असून, कलम 144 लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातच,

हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचं दिसतंय.   जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी माझ्या सासऱ्यांना तुमची मुलगी कोरोनाने मेली असती. तर तुम्हाला नुकसानभरपाई  मिळाली असती का?, असा प्रश्न विचारल्याचा धक्कादायक खुलासा पीडितेच्या वहिनीने केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर योगी सरकारवर संताप व्यक्त होत आहे.