कोरोना लसीचे निरासन करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनीच सर्वप्रथम लस टोचून घ्यावी:राष्ट्रवादीच्या ‘ या’ नेत्याची मागणी

4

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यात लसीच्या वाहतुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेडकडून सीरम कंपनीतून देशाच्या अन्य भागांत लसीची वाहतूक केली जाणार आहे.कोरोना लसीच्या  सुरक्षिततेविषयी अद्याप काही शंका आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी कोरोना लसीकरणाच्या मोहीमेविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी लाशीबाबत सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वप्रथम लस टोचून घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली.

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेत कोरोना लसीविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेण्याची मागणी केली. त्यामुळे आता भाजपकडून नवाब मलिक यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.