कोरोना विषाणूमुळे हैराण असलेल्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणार असल्याचं केंद्रीय पशिविकास खात्याचे राज्यमंत्री प्रताप सारंगी यांनी सांगितलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारच्या नागरिकांना मोफत कोरोना लस देणार असे आश्वासन दिल्यामुळे अन्य राज्य भारताचे भाग नाहीत का ? असा सवाल विरोधी पक्षांनी केला होता. कोरोना साथीचा वापर भाजप राजकीय स्वार्थासाठी करत असल्याची टीकाही केली जात होती. यावर ओडिशाचे अन्नपुरवठा मंत्री आर.पी. स्वैन यांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रताप सारांगी यांनी उत्तर दिलंय.
देशातील सर्व जनेतेला मोफत लस द्या अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती.
- ९८० रुपयांत कोरोना चाचणी
सध्या राज्यात शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी मोफत आहे. तर, खाजगी प्रयोगशाळेत चाचण्यांचे दर कमी झाले असून ९८० रुपयांत चाचणी होत आहे. कोरोना चाचणीचे दर ४५०० वरून ९८० इतके कमी सामान्यांना परवडतील असे ठरवण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. साध्य महाराष्ट्रात कोरोनाचे अॅक्टिव्ह पेशंटची संख्य कमी झाल्याने नागरिकांनी थोडासा सुस्कारा सोडला असल्याचं पाहायला मिळतंय.