होय..!
सध्या भारतीय पुरावा अधिनियम, 1872 (Indian Evidence Act 1872) च्या कलमांनुसार व्हॉट्सअप चॅट न्यायालयात पुरावे म्हणून पात्र आहेत. कायद्याच्या कलम 65 (ए) मध्ये असे म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जर काही निकष पूर्ण करत असेल तर ते सिद्ध केले जाऊ शकतात. कायद्याच्या कलम 65 बी मध्ये अश्या निकषांचा उल्लेख केला आहे.
त्यात हे निकष आहेः ज्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मधून पुरावे घ्यायचे आहे ते डिव्हाईस नियमितपणे वापरले पाहिजे, डिव्हाइसमध्ये असलेली माहिती अशी असावी की ती नियमितपणे डिव्हाइसमध्ये दिली जाते, डिव्हाइस योग्य प्रकारे कार्य केले पाहिजे आणि त्यामध्ये पुरविलेल्या माहितीवर परिणाम करू नये. तयार केलेला पुरावा मूळ डिव्हाइसवरील रेकॉर्डची डुप्लिकेट असावा, म्हणजेच तो ओरिजनल चा कॉपी असावा.
लेखक – ॲड. सूरज बाळासाहेब चकोर
हाई कोर्ट, मुंबई.
9763543434