कोरोनाची दुसरी लाट अोसरत असतांना तीसर्या लाटेचा संभाव्य धोका शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तीसर्या लाटेत सर्वाधीक धोका हा लहान मुलांना असेल असे अंदाज वर्तवले जात आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणावर भर देण्यास वैद्यकीय विभागाने सुरुवात केली असून लहान मुलांवर लसीकरणाची ट्रायल घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीला केंद्र सरकारने ट्रायलसाठी मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमिवरच २ ते १८ वयोगटातील एकुण ५२५ मुलांवर वेगवेगळ्या केंद्रांमध्ये चाचणी केली जाणार आहे.
यामध्ये पाटणा येथील एम्स रुग्णालयात तीन मुलांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर या मुलांना दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. या तीनही मुलांमध्ये कुठलीही वेगळी लक्षणं जाणवली नसल्यामुळे २८ दिवसांनंतर त्यांना दुसरा डोससुद्धा देण्यात येणार आहे.
येणार्या तीसर्या लाटेच्या पार्श्वभूमिवर लहान मुलांचे जलदगतीने लसीकरण झाल्यास आपण या लाटेस थोपवण्यास यशस्वी होऊ तसेच होणारी हानीसुद्धा आपण यामुळे टाळू शकतो असे मत शास्त्रज्ञ्ज व तज्ञ्जांनी व्यक्त केले.