सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्जवरून वातावरण गरम आहे. अभिनेता सुशांतसिंग मृत्यूप्रकरणामुळे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यातच अभिनोत्री सारा अलि खान, दीपिका पदुकोन आणि श्रद्धा कपूर यांचा एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. याबरोबरच ड्रग्ज वर एक वेबसिरिजदेखील बनत आहे. यामुळे सध्यातरी ड्रग्ज चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अभिनेत्री यामी गौतमी हिलादेखील ड्रग्जविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला तिने दिलेले बेधडक उत्तराने सर्वच आश्चर्यचकित आहे.
आस्क मी एनथींग या सेशनअंतर्गत तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नाची उत्तरे दिलीय. यामध्ये एका चाहत्या तिला प्रश्न विचारला होता की काय आपणही ड्रग्ज घेता का? चाहत्याचा या प्रश्नाला यामीने उत्तर दिले असून नाही मी कधीही ड्रग्जचे सेवन करत नाही. मी पूर्णपणे ड्रग्ज घेण्याच्या विरोधात असून कोणीही ड्रग्जचे सेवन करू नका असं तिने म्हटलं आहे