भाजपचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंची पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे. या दरम्यान गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अशोक गुप्ता यांनी कल अचानक त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अशोक गुप्ता यांनी विधानभवनात काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसमध्ये पक्षांतराची घोषणा केली. गुप्ता यांच्यासह राजकुमार पटले, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश देवाधारी, पंचायत समिती सदस्य विजय उके, चुनेश पटले, नरेंद्र चिखतोंडे, गोपाल अजनीकर, आसिफ अहमद अली, योगेश भेलावे, महेश पाचे, सचिन मेश्राम, मनीष लाजेवर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.