खडसेंच्या पक्षांतराबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

18

भाजपचे नेते एकनाथ खडसे हे पक्षाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अशी चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. 17 ऑक्टोम्बरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर याबाबत जनतेला सांगणार होते. एकनाथ खडसेंनी त्यांच्यावर अन्याय झाला असून त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना जबाबदार ठरवले आहे. या पक्षांतराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मौन होते.

दरम्यान 23 सप्टेंबरला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली. त्यांनतर पवार म्हणाले, ‘तुम्ही मला कित्येक वर्षे ओळखता, राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होतात. त्यानुसार काही जण भेटून गेले. याबाबत काही चुकीचे समजू नये. भाजपचे सरकार असतानादेखील आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने अनेक वेळा भेटलो आहोत. मी सगळ्यांना भेटत असतो.

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले तेव्हा ‘एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांना राजकारण चांगले कळते, ते योग्य निर्णय घेतील. असा मला विश्वास आहे’ असे त्यांनी व्यक्त केले.