सुप्रसिध्द गायिका व इंडियन आयडलची परीक्षक नेहा कक्कर नेहमी तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. परंतु सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. तिने काही दिवसांपूर्वीच रोहनप्रीत बरोबरचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. तिने दोघांच्या नात्याची कबुली देखील दिली होती. दोघांनी रिलेशनशिप देखील मान्य केले आहे. आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. नेहाच्या चाहत्यांनी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या दरम्यान नेहाने पिंक पंजाबी ड्रेसमध्ये फोटो व्हायरल केले आहेत. या फोटोंना कॅप्शन दिले आहे. त्यावरून चाहते असा अंदाज बांधत आहेत की, लवकरच नेहा लग्नबेडीत अडकणार आहे. या फोटोंवरील कॅप्शनमधून नेहा कक्करने तिच्या लग्नाची घोषणा केली आहे.
‘आजा चल व्याह करवाइये लॉकडाउन विच कट्ट होने खर्च’ या माझ्या मेरी डायमंड का छल्ला गाण्यातील आवडत्या ओळी आहेत. तुमच्या कोणत्या आहेत’ असे कॅप्शन तिने दिले आहे. नेहा कक्करने हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.
नेहा कक्कर ऑक्टोम्बर अखेरीस रोहनप्रीत सिंगबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. 24 ऑक्टोम्बर दिल्लीमध्ये नेहा आणि रोहनप्रीत सिंग यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. याबाबत आमंत्रण देखील पाठवली आहे. यांचा लग्नसोहळा अंत्यत साध्या पद्धतीने होणार आहे. लग्नाला काही मोजकेच नातेवाईक, मित्रमंडळी असतील. अशा प्रकारे लग्न सोहळा पार पडणार आहे.