COVID-19 या असाध्य आजारामुळे संपूर्ण जग हैराण आहे. सुरूवातीला साधा वाटणारा हा आजार आता आपल्या घरापर्यंत आल्याने सगळेच चिंतेत आहेत. सगळेच कोरोनावर एखाद्या प्रभावी लसीची वाट पाहत आहे. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेनं आनंदाची बातमी दिली आहे. या वर्षाअखेर पर्यंत कोरोनावर प्रभावी लस येईल असं WHO चे अध्यक्ष टेड्रोस एडहानॉम यांनी म्हटले आहे.
वॅक्सिनची वाट संपूर्ण जग पाहत आहे, ते वॅक्सिन या वर्षाअखेरपर्यंत तयार होणार आहे. मात्र हा दावा करताना त्यांनी ठामपणे काहीही सांगितले नाही मात्र त्यांना अशी आशा असल्याचे सांगितले आहे. डब्लूएचओच्या नेतृत्त्वात येणारी COVAX ग्लोबल वॅक्सीनच्या जवळपास ९ प्रकारच्या वॅक्सिनवर काम सुरु आहे. ज्या चाचण्यांमधून त्यांचे परिणाम चांगले दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच वॅक्सिनचे परिणाम असेच येत राहिले तर यावर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल अशी आशा डब्लूएचओने व्यक्त केली आहे.