गद्दे की बात करने वाले; मोदींनी स्वतःसाठी घेतलेल्या 8000 करोड रुपयांच्या विमानावर चूप का ? : राहुल गांधी

26

अटल टनेल मध्ये कुणीही नसतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हात हलवत अभिवादन करत होते. यावर सोशल मिडिया मध्ये मोदींवर यथेच्छ टीका करण्यात आली. या टीकेत काँग्रेसने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यातच अचानक राहुल गांधी यांचा ट्रॅक्टर वर बसलेला फोटो व्हायरल झाला. आणि ट्रॅक्टरला लावलेल्या सोफ्यावरून त्यांनाही ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावरही अनेकांनी प्रतिक्रिया दिली.

“राहुल गांधी व्हीआईपी शेतकरी आहेत ते ट्रॅक्टर वर सुद्धा सोफा लाऊन बसतात.” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच दिली होती. त्यावर आता राहुल गांधीनी  यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

कुणीतरी ट्रॅक्टर वर गादी लावली. तर मला प्रश्न विचारले जातात. मोदींनी स्वतःसाठी 8000 करोड रुपयांची दोन विमान घेतली त्यांना प्रश्न का विचारत नाहीत. असं त्यांनी म्हटलंय. त्या विमानात फक्त कुशनच नाही तर पलंग आहे. आणि एक पलंग नाही तर 50 पलंग आहेत. असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ट्रम्प कडे अशी विमान आहेत म्हणून मोदींनाही ती पाहिजेत यावर कुणी बोलत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.