राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी, ‘माजी मंत्री गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यासोबत अनेक वर्षे असल्याने त्यांची अनेक गुपिते आपल्याजवळ आहेत. मात्र भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्याने दोघांकडून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत,’ अशी तक्रार केली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केलेल्या गौप्य स्फोटामुळे जळगाव मध्ये वातावरण तापलं आहे.
‘लोढा हे कायम तक्रारी करत असतात. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे द्यावेत’ असं गिरीश महाजन म्हणाले. दुसरीकडे लोढा यांनी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.