जळगाव : घटस्थापनेच्या दिवशी गुप्तधन प्राप्त करण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न तापी सूतगिरणी आवारात घडल्याची घटना शुक्रवारी उघड झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नरबळी देण्यासाठी आणलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान राखून पोबारा केला, त्यामुळे अनर्थ टाळला गेला. पंचायत समितीचे सदस्य भरत बाविस्कर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
बाजूच्या तालुक्यात एक आदिवासी व्यक्तीचा गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा घाट सूतगिरणी कामगारांनी घातला होता. पूजा साहित्य, घेऊन व त्या आदिवासी व्यक्तिला ता पाण्याने अंघोळ सूतगिरणीचे दुसऱ्या बाजूस सुरू असलेल्या बांधकामांन जवळ घेऊन गेले. तेथे लिंबू, अंडी, अगरबत्ती, गुलाल, मिरची, नवी चादर, सुई असे साहित्य पाहिल्यावर सदर व्यक्तीच्या लक्षात आले की, आपला नरबळी दिला जात आहे. ते दिसता क्षणी त्याने प्रसंगावधान राखत धूम ठोकली म्हणून सदर प्रकार टळला, अशी माहिती आहे.