गृहमंत्र्यांनी उचललं ‘हे’ पाऊल, कोरोनारुग्णांची लूट थांबणार?

35

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर बील आकारले जात असल्याचे समोर येत आहे. आजाराने त्रस्त नागरिकांना भरमसाठ बिल आकारली जात आहेत, शासकीय निर्देशानुसार तपासणीचे पैसे न घेता अतिरिक्त शुल्क आकारणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्या दिवसागणिक वाढताना देखील दिसत आहेत.

यासाठी प्रसंगी ‘स्टिंग ऑपरेशन’ सारखी आकस्मिक भेटीची गुप्त मोहीम राबवून खासगी हॉस्पिटल, खासगी कोरोना तपासणी लॅब तसेच खासगी प्लाझ्मा लॅबवर करडी नजर ठेवली जाईल. सामान्य नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. ते नागपुरात बोलत होते. यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळेल, तसेच लुटमार करणारांना चाफ बसेल यात शंका नाही.