चंद्रकांत पाटलांनी पाडलेले खड्डे बुजवतोय : अशोक चव्हाण

12

काँग्रेस मध्ये कुणी खड्डे पडून शकत नाही. काँग्रेस भक्कम आहे. महविकास आघाडी पाच वर्ष पूर्ण करेल, सध्या मी चंद्रकांत पाटील यांनी पाडलेले खड्डे बुजवतोय, असा टोला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. नांदेडात काल ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी कामगारांच्या विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी हा ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला होता.

मागच्या सरकारने दिशाहीन काम केले. मराठवाड्यावर अन्याय केले आहे. त्यांनी केलेलं सगळे खड्डे मी बुजवण्याचे काम करत आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. केंद्रातल्या सरकारने अन्यायकारक शेतकरी विरोधी कायदा आणला असल्याने तो कायदा धनदांडग्यांना फायद्याचा आहे. त्यामुळे या कायद्याचा विरोध करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.