चित्रपट समीक्षा : रातसासन #CinemaGully

29

सुयोग देशमुख

सोशल मीडियावरील चित्रपटप्रेमी मित्रांच्या चर्चेत “रातसासन” या तामिळ/मल्याळम चित्रपटाची चर्चा वाचली आणि हा चित्रपट लवकरात लवकर बघावाच लागेल हे ठरवलं आणि आज hotstar वर हा चित्रपट बघितला.यावर्षी आयुष्यात पहिल्यांदाच फिल्म फेस्टिवल मध्ये हजेरी लावल्यामुळे आपली भाषा सोडून दुसऱ्या भाषेचा चित्रपट बघण्यात काही अडचण जाणवली नाही.

भारतात OTT apps आल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात क्रिमिनल आणि थ्रिलर वेबसिरीज ची लाट आली या लाटेत खूप चांगल्या कलाकृती आल्या असल्या तरी त्यात जास्त वेळ दाखवायला असल्या कारणाने मुख्य विषय सोडून दुसऱ्या कथा मध्ये घुसवून दाखवल्यामुळे त्या कलाकृतीचा मूळ विषय थोडा वेळ बाजूला पडल्यासारखा जाणवतो.

याच धर्तीवर आलेला “रातसासन”हा चित्रपट मात्र या बाबतीत मागील काही दिवसातील चित्रपटापेक्षा सरस ठरतो.यामध्ये एक सिरीयल किलर जो अतिशय क्रूर पद्धतीने मुलींचे खून करत सुटला असतो,त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस कसे प्रयत्न करतात,त्या गुन्हेगाराला पकण्यासाठी वेगवेगळ्या लॉजिक चा वापर,प्रत्येक मिनिटाला घडणारा रोमांच,ड्रामा आणि इमोशन अत्यंत प्रभावीरीत्या दाखवण्यात आलं आहे.

भाषा कळत नसली तरी मुलींवर शाळेत अत्याचार करणारा शिक्षक असो,आपला अहंकार आणि पदाचा गैरवापर करून चुकीचा तपास करून मुलींच्या आयुष्याशी खेळणारी पोलीस ऑफिसर असो किंवा गुणवत्ता असूनही फक्त ज्युनियर पोलीस ऑफिसर असल्यामुळे उपेक्षित असलेला चित्रपटाचा नायक असो या सगळ्यांच्या व्यक्तिरेखेच्या आणि कथेवर केलेली मेहनत आज त्याच्यात प्रभावी मांडणीमुळे एकामागून एक येणाऱ्या दृश्यातून हा चित्रपट आपल्या खिळून ठेवतो.

“दृश्यम”बघितल्यावर पुढचे काही दिवस त्याच कथेच्या विचारात होतो अगदी तसच “रातसासन”बघून झालंय.
दर्जेदार अभिनय,दमदार कथानक,अचूक मांडणी करून लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या रामकुमार यांनी एक दमदार आणि प्रेक्षणीय कलाकृती सादर केली आहे.