अनिल संगणगिरे
चित्रपट : PSYCHO
दिगदर्शक: मिस्किन
कलाकार: उद्यानिधी स्टालिन, आदीतीराव हैदरी, नित्या मेनन, राजकुमार पिचूमनी
वास्तवदर्शी सिनेमा बनवण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या साऊथ इंडस्ट्रीचा ह्यावर्षी येऊ घातलेला अजून एक मास्टरपीस म्हणजेच PSYCHO. मूळचा तमिळ भाषेत असणारा हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी मेजवानीच आहे. हल्ली वास्तवदर्शी सिनेमांचा ओघ आणि प्रेक्षकवर्ग दोन्ही वाढत चाललाय त्यामुळे PSYCHO हा असाच दुसरा तिसरा थ्रिलर नसून ह्या सिनेमाची महती वेगळीच आहे.
कथा, पटकथा, अभिनय, आणि उत्तम दिगदर्शन यांची सांगड म्हणजेच हा सिनेमा,
सिनेमाचं कथानक एका अंध व्यक्तीभोवती गुंफलेलं आहे व नावाप्रमाणेच PSYCHO असणारा विलेन पण ह्यात आहे, तसं पाहिलं तर स्टोरी काही हटके नाही आणि विषय सुद्धा, पण ह्या सिनेमाची जमेची बाजू आहे ती ह्यातला खरेपणा, कुठलेच ओव्हर द टॉप FIGHTING सिन , कुठलेच भव्य सेट ,भव्य ग्राफिक्स, नसतानाही हा सिनेमा प्रेक्षकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पकडून ठेवतो.
थ्रिल, सस्पेन्स , रिऍलिटी, दमदार पटकथा आणि अभिनय ह्यासाठी हा सिनेमा एकदा पाहायलाच हवा सध्या नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.