चीनला किंमत मोजावी लागेल, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धमकावले

17

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काहि दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये येताच धमकी दिली आहे. कोरोना महामारीचा ट्रम्प यांनी चीनवर ठपका ठेवत, चीनने जगासोबत जे काही केलं आहे, त्यांना त्याची मोठी जब्बर किंमत मोजावी लागेल, असं मोठं विधान केलं आहे.  ट्रम्प हाऊसमधून देशाला संबोधताना हे विधान त्यांनी केलं.

ट्रम्प म्हणाले की, कोरोना ही चीनची चूक आहे. चीनने देशासाठी आणि जगासाठी जे केले आहे. त्याची मोठी किंमत चीनला मोजावी लागेल, अशी धमकीच ट्रम्प यांनी दिलीय. दरम्यान, ट्रम्प यांना कोरो नाची लागन झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. स्वतः ट्रम्प यांना कोरोना झाल्याने डोनाल्ड ट्रम्प चीनवर चांगलेच संतापले आहेत.