चेन्नई सुपर किंग्सची ५ गडी राखून विजयी सलामी

18

अबुधाबी येथे आजपासून सुरु झालेल्या आयपीएल २०२० च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला हरवत ५ गडी राखून सामना जिंकला. नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई ची सुरुवात चांगली झाली असतानाही त्यांना १६२ वर रोखण्यात चेन्नईला यश आले.

धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात मात्र अडखळत झाली असतानाही अंबाती रायडू आणि फाफ डूप्लेसीस यांच्या भागीदारीने चेन्नईला विजयासमीप नेवून सोडले. बाद होण्यापूर्वी रायडूने ७१ धावा काढल्या तर डूप्लेसीस ५८ धावांवर नाबाद राहिला. धमाकेदार खेळी करणारा चेन्नईचा अंबाती रायडू सामनावीर ठरला.

फोटो साभार – @IPL