राज्यात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढताना दिसते आहे. दरम्यान, दि.१५ ऑक्टोबर रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ वाढदिवस असतो. कार्यकर्त्यांच्या गराड्यात आत्तापर्यंत अनेक वाढदिवस साजरे केलेल्या भुजबळांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
१५ ऑक्टोबरला कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी न करता आपापल्या विभागात कोरोनाबाबत आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम तसेच जनजागृतीपर उपक्रम राबवावे असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.