जळगाव : लग्नास नकार दिल्याने, भर रस्त्यात घेतले चुंबन

28

जळगावमध्ये काल लग्नाला नकार दिल्याने तरुणाने अल्पवयीन तरुणीला जबरदस्तीने रस्त्यात अडवून मिठीत घेतले. इतकचं नाही तर चुंबन घेत मित्राला फोटो काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. चुंबन घेणार सचिन करणसिंग पवार वय (२१) आणि त्याचा मित्र सतीश रमेश पवार वय (२२) यांना मंगळवारी अटल करण्यात आली आहे.

१२ वी मध्ये शिक्षण घेत असलेली १७ वर्षीय तरुणी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या परिसरात राहते. नातेवाईक असलेल्या मुलाने वर्षभरापूर्वी लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मुलीचे वय कमी असल्याने कुटुंबाने नकार दिला. तेव्हापासून सचिन धमक्या देत होता. तू लग्न केले नाहीय तर तुला पळवून नेईन व तुझ्या भावाला उचलून नेईन त्यामुळे घाबरलेल्या मुलीने सदरील प्रकार कुटुंबाला सांगितला. तरीही सचिन पवारचा पाठलाग सुरूच होता.