जवान प्रमोद लिंगदळे यांचा अपघाती मृत्यू

167

नांदेड : देगलूर तालुक्यातील तमलुर या गावचे रहिवासी असलेले भारतीय नवजावन प्रमोद लिंगदळे यांचा आज पुणे येथील सैनिकी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जवान प्रमोद लिंगदोळे हे भारतीय सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतांना दिनांक २ ऑक्टोबर रोजी रजेवर आपल्या मातृभूमी परतले असता. दिनांक १० ऑक्टोबर रोजी त्यांचा मोटारसायकल वर अपघात झाला. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता प्रकृती चिंताजनक असल्याने पुणे येथील सैनिकी रुग्णालयात हलवले गेले असता आज मृत्यूशी झुंज देतांना जवान प्रमोद लिंगदळे यांनी अखेरचा स्वास घेतला. यांच्या दुर्दैवी मृत्यु मुळे कुटुंब, मित्रमंडळ व तमलूर ग्रामस्थावर मोठा शोककळा पसरला.