जे राहूलला जमले नाही ते भीम आर्मीने करून दाखवले

15

हाथरस प्रकरण देशभर चांगलेच गाजत असून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पीडीत तरूणीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उत्तरप्रदेशमधील हाथरस या ठिकाणी घडली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने परस्पर पीडीत तरूणीच्या चितेला अग्णी दिल्याने लोकांचा पोलिस प्रशासनावर संताप आहे. उत्तर प्रदेश सरकार पोलिसांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सर्वच स्थरातून होत आहे.

या प्रकरणा आता नवीन माहिती समोर येत असून तेथील डीएम यांनी संपूर्ण केस बदलून टाकण्याची धमकी पिडीत तरूणीच्या कुटूंबीयांना दिली आहे. कोणत्याही माध्यम प्रतिनिधींना तरूणाच्या कुटूंबीयांना बोलू दिले जात नाही. तसेच राहूल गांधी यांना देखील पिडीतेच्या घरी जाण्यापासून रोखण्यात आले. दरम्यान, भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याने पीडीतेच्या कुटूंबीयाची भेट घेतल्याचा दावा केला आहे. तसेच तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, पीडितेचे कुटुंब एका काळोख असलेल्या खोलीत बसले आहे. पीडितेचे आई, वडील, बहीण आणि भाऊ यावर पोलिस आणि प्रशासनाकडून बरीच विधाने करीत आहेत. डीएमने त्यांच्यावर दबाव कसा आणला हे ते सांगत आहेत.