टीम इंडियाचे ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जारी, येथे पहा संपूर्ण वेळापत्रक….

18

डिसेंबर मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहे. सध्या इंडियन प्रीमियर लीग अंतिम टप्प्यात आहे. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया साठी रवाना होईल. वेळापत्रकानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.
दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होईल. 27, 29 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर रोजी तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. डिसेंबर 4, 6 आणि 8 रोजी तीन टी-20 सामने खेळले जातील. त्यानंतर पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून सुरू होईल.

संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक :


पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी

दुसरी ODI : 29 नोव्हेंबर – सिडनी

तिसरी ODI : 02 डिसेंबर – कॅनबरा

पहिली टी20 : 04 डिसेंबर – कैनबरा

दुसरी टी20 : 06 डिसेंबर – सिडनी

तिसरी टी20 : 08 डिसेंबर – सिडनी

पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर – एडिलेड

दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर – मेलबर्न

तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी – सिडनी

चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी – ब्रिसबेन