अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुका तोंडावर आहेत. नुकतीच ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बिडन आणि ट्रम्प यांच्यात खुली चर्चा झाली. यानंतर आता ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे.
ट्रम्प यांच्या सल्लागार होप हिक्स यांनादेखील कोरोनाची बाधा झाल्याची बातमी समोर आली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया या दोघांनीही स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते.
दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. अनेक सर्वामध्ये ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचा दावा करण्यात येत असून जो बिडन यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना कोरोना झाल्याने याचा निवडणूक निकालावर काय परिणाम होतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.