…तर जिम सुरू करायला परवानगी देऊ : उध्दव ठाकरे

8

राज्यभरात बार, हॉटेल्स, ग्रंथालय सुरू करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या व्यायाम शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिम व्यावसायिकांसोबत बैठक घेतली आहे. तसेच कोरोना परिस्थिती हाताळत जिम कशी उघडणार याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. यावेळी जिम उघडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात समोर आली होती. याला सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी व्यवसायिकांनी केल्यानंतर दसऱ्यापासून जर सगळे मार्गदर्शक तत्वे काटेकोरपणे पाळले जाणार असतील तर राज्य सरकार जिम सुरू करण्यास परवानगी देईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम व्यवसायिकांना सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच जिम सुरू होतील अशी अपेक्षा व्यायाम प्रेमींना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यभरातील जिम व्यवसायिक, फिटनेस सेंटर आणि व्यायामशाळा प्रतीनीधीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.