..तर मी भाजपात प्रवेश करीन, बच्चू कडू यांची गुगली

25

राज्यमंत्री बच्चू कडू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत आसतात. अमरावती जिल्ह्यातील अचलपुरचे आमदार असलेले बच्चूभाऊ त्यांच्या हटके आंदोलनांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. सध्या बच्चू कडू चर्चेत येण्याचे कारण थोडं वेगळं आहे. भाजपाचे कट्टर विरोधक असलेल्या कडू यांनी चक्का आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र यासाठी त्यांनी दोन अटी ठेवल्या आहेत.

केंद्र सरकारने नुकतेच कृषी विधेयक संसदेत मंजूर केले. हे कृषीविधेयक कशा प्रकारे शेतकरी हिताचे आहे हे सांगण्याचा पुरेपुर प्रयत्न सत्ताधारी भाजपा करत आहे. मात्र भाजपा नेत्यांच्या याच दाव्याला खोडून काढण्यासाठी बच्चू कडू यांनी भाजपाने निवडणूकित दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उत्पादन खर्चाचा दीडपट हमीभाव देण्याचे तसेच त्या भावाने शेतमाल खरेदी करण्याचे आवाहान दिले आहे. जर भाजपाने हे दोन आश्वासने पाळले तर आपण भाजपात प्रवेश करू असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.