“तुम्ही आमची प्रकरणं बाहेर काढाल, तर तुमची ती प्रकरणं बाहेर काढू” काय म्हणाले नितेश राणे

8

नितेश राणे यांनी आज विधानसभेत सत्ताधारी महाविकासअाघाडीला चांगलेच बोल लगावले आहे. “एखाद्या विषयावर आम्ही बोलायला लागलो, काही प्रकरणं बाहेर काढलीत की आम्हाला धमक्याचे फोन येतात, कदाचित सत्ताधार्‍यांना माहिती नसेल, आम्हीसुद्धा शिवसेनेत ३९ वर्षे होतो. तुम्ही आमची प्रकरणं बाहेर काढाल तर आम्हीसुद्धा तुमची प्रकरणं बाहेर काढू” असा धमकीवजा ईशाराच नितेश राणे यांनी दिला आहे. दरम्यान यानंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगत आहे.

“सत्तेत सहभागी असणार्‍यांना अभय दिले जात आहे. अनेकठिकाणी खाजगीमध्ये व्यवहार होतात. टक्केवारी ठरल्याशिवाय कामे होत नाहीत, टेंडर निघत नाहीत असे आरोप करत त्यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे. तसेच अंगावर आले तर शिंगावर घ्या अशी शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे. त्यामुळे आम्हाला डिवचु नका, नाहीतर आम्ही तुम्हाला जशास तसे ऊत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.” असेसुद्धा नितेश राणे यावेळी बोलत होते.

पुजा चव्हान प्रकरणावरुनसुद्धा नितेश राणे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ११ अॉडिअो क्लीप व्हायरल झाल्या आहेत ज्यामध्ये पुजा चव्हान प्रकरणांत कोण सामील आहे हे स्पष्ट आहे. तरिसुद्धा सरकारने कारवाईस दिरंगाई केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गुन्हा केला असतांनासुद्धा मंत्रीमहोदयांकडून शक्तीप्रदर्शन केले जाते. सरकारचे अभय असल्याशिवाय कुणाचीही एवढी हिम्मत होऊच शकत नाही. असे अनेक आरोप नितेश राणे यांनी आज विधानसभेत बोलतांना आज केले आहेत.