बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे. यावेळी अनेक वादग्रस्त वक्तव्याबरोबर अजून एक घटना समोर येत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे बिहारमधील औरंगाबादेत प्रचारसभेसाठी गेले होते. या सभेदरम्यान त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पहिल्यांदा मारलेली चप्पल ही त्यांच्या कानापासून गेली, आणि दुसरी चप्पल थेट त्यांना लागली. तेजस्वी यादव मंचावर बसले असताना हा प्रकार घडला.
यावेळी मंचावर इतर नेतेही उपस्थित होते. त्या वेळी तेजस्वी यादव यांनी कार्यकर्त्यांना खाली बसण्याची विनंती केली. तेजस्वी यांना चप्पल मारल्याचे लवकर लक्षात आले नाही. परंतु शेजारील राजन नेत्याच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेत दुसरी चप्पल तेजस्वी यादवांना लागली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी या घटनेला राजकीय रंग न देता दुर्लक्ष केले. 28 ऑक्टोम्बरला पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरवात होईल. आणि 10 नोव्हेंम्बरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.