तेजस ठाकरे यांनी शोधली माशाची नवी प्रजात, ‘हे’ ठेवलं नाव

20

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठोकरे यांना जीवशास्रात प्रचंड रस आहे. याआधी तेजस ठाकरे यांनी खेकड्याच्या काही नवीन प्रजाती शोधून काढल्या होत्या. आता तेजस ठाकरे यांनी माश्याची नवी प्रजात शोधून काढली आहे. शोधलेल्या या नव्या माशाला हिरण्यकेशी असं नाव देण्यात आलं आहे.

आंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारी माशाची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली आहे. या माशाची ही 20 वी प्रजाती आहे. तर तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. या आधी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पालींच्या दुर्मीळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.

कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत असताना तेजस यांनी खेकड्याच्या पाच प्रजाती शोधल्या. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला. न्यूझीलंडच्या ‘झुटाक्सा’ या नियतकालिकात आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांबद्दलचं दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं होतं. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील ‘सह्याद्री’ या रांगड्या मराठी नावावरुन एका खेकड्याचं ‘सह्याद्रियाना’ असं नामकरण करण्यात आलं होतं.