तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी आणि शरद पवारांची बारामतीत भेट….

0

तेलंगणा राज्याचे कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी हे त्यांच्या शिष्टमंडळासह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांना शेती विषयातील गाढा अभ्यास असल्यांनं ही भेट होती. तेलंगणा राज्याला स्वतंत्र दर्जा मिळाल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आपापल्या क्षेत्रातील उत्तम काम करणाऱ्या राज्यांना भेटी देण्यास सांगितले आहे. यामुळे तेलंगणाचे कृषिमंत्री एस.निरंजन रेड्डी हे कालपासून बारामतीत आहेत. त्यांनी बारामतीतील अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदानगर शैक्षणिक संकुल, कृषी विज्ञान क्षेत्रातील शेती व शेतीपुरक व्यवसायांची माहिती घेतली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्टमंडळही माहिती घेत आहे.

या भागातील आधुनिक शेती, तसेच कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते आले होते. विज्ञान केंद्रास भेट देऊन त्यांनी शेतीसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यासही केला आहे. पुणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती, येथील मृदा व पाण्याची स्तिथी जाणून घेतली आहे. तसेच येथील जिवाणू प्रयोगशाळा, माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळेलाही भेट देऊन माती परिक्षणाची आधुनिक पद्धत समजून घेतली आहे.

दरम्यान कृषिमंत्री एस निरंजन रेड्डी यांनी शरद पवारांची बारामतीच्या गोविंद बागेत भेट घेतली आहे. ही भेट राजकीय नसल्याचेही रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. कृषिमंत्री एस निरंजन रेड्डी हे बारामतीचा दौरा आटोपून पुढील दौऱ्यासाठी रवाना झालेत.