त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना अपयशी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : महापौर किशोरी पेडणेकर

1

मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते आशिष शेलार महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यांच्या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेने मुंबईत चांगल्याप्रकारे काम केले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना अपयशी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर  यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले आहे. या काळात आपल्याला कोणी वाचवलं आणि कोण आपल्याला संकटात घालत आहे, हे मुंबईकर पाहतच आहेत, असे पेडणेकर यांनी म्हटले.