नुकताच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज या सोहळ्यास ऊपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांनीदेखील याबकार्यक्रमास हजेरी लावली होती. दरम्यान फडणवीस आणि राऊत यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर लगेचच राजकीय वर्तुळात चर्चेस ऊधाण आले होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रपरिषदेत ते बोलत होते.
“आपल्या देशाची एक संस्कृती अशी आहे. दुश्मन जरी असला तरी तो दुश्मन नावाच्या आणि कामाच्या जागी असतो. एरवी आपण एकमेकांना खूप प्रेम देतो. संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस गेले होते. स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यानंतर त्यांचे दोन राजकीय विचार वेगळे असू शकतात पण गळाभेट ही प्रेमाची होती. कारण राजकारणात दुश्मनी कधीच नसते. उलट मैत्री असायला पाहिजे. शरद पवार यांच्यावर आम्ही टीका करतो. पण मी शरद पवारांना भेटल्यावर प्रथम वाकून नमस्कारच करणार, कारण ही आमची संस्कृती आहे”, असे पाटील यावेळी म्हणाले.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार यांच्याशी पूर्वशीचा साखरपुडा झाला. त्यावेळी ही गळाभेट झाली आणि त्यानंतर विविध चर्चा रंगल्या होत्या.