सुप्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची शिष्या जसलीन मथारू यांच्या नात्याबद्दल सोशल मिडीयावर नेहमीच चर्चा होत असतात. नुकताच त्यांचा एक फोटो व्हायरल झालाय. या फोटोची संपूर्ण सिनेसृष्टीत चर्चा असून अनेकांनी या दोघांनी लग्न केले असल्याचा अंदाज या फोटोवरून बांधला होता. मात्र, खूद्द अनुप जलोटा यांनी या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मी देखील त्यांना रिटर्न शुभेच्छा दिल्याचे जलोटा यांनी म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जलोटा नवरदेवाच्या तर जसलीन नवरीच्या वेषभुषेत दिसत होती. यामुळे त्यांनी लग्न केले असल्याची शक्यता जोर धरत होती. मात्र, हा फोटो एका चित्रपटातील सीन असल्याचं जलोटा यांनी स्पष्ट केल्याने व्हायरल फोटोबाबत होणार्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम लागला आहे.