‘त्या’ स्टंटबहादरांवर गुन्हा दाखल, २२ मजली इमारतीच्या कठड्यावर केला होता जीवघेणा स्टंट

8

प्रसिद्धीचा हव्यास अनेकांना नडतो आणि कित्येकांना यामुळे आपल्या प्राणालाही मुकावे लागते. स्टंट करून प्रसिद्धी मिळिवण्याचे प्रयत्न अनेकदा तरूण करत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मुबईतील कांदीवली भागातील एक युवक तब्बल २२ मजली ईमारतीच्या कठड्यावर हातावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे दोन सहकारी व्हिडीओ शूट करण्यासाठी मदत करत आहेत.

सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी सेल्फी आणि व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करताना दरवर्षी जगभरात बर्‍याच लोकांचा मृत्यू होतो. २०१८ मध्ये, हैदराबादमध्ये रेल्वेच्या रुळालगत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत असताना एका व्यक्तीला रेल्वेने धडक दिली होती.

हा धोकादायक स्टंट करणाऱ्या तरूणाचे नाव डिसूझा असे असून त्याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.