थंडी पडायला लागलीय ! ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी…

18

दिवाळी जवळ येऊ लागली तशी थंडीची सुद्धा चाहूल लागलेली आहे. हळुवार थंड वारा त्वचेला स्पर्श करताना त्रासदायक वाटू लागलेला आहे. त्वचा रुक्ष, कोरडी पडायला लागलेली आहे. चला तर मग थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची कशी काळजी घ्यायला पाहिजे ते पाहूया…

  1. त्वचेवर हळद, बेसन, लिंबाचा रस आणि मधाचा पॅक बनवून लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
  2. लिंबाच्या रसात अरेंडीचे तेल सम मात्रेत घेऊन चेहऱ्यावर मालीश करून कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.
  3. त्वचा वेळोवेळी पाण्याने स्वच्छ धुवायला हवी. जेणेकरून त्वचेवर असले ले धुलिकन निघून जातील.
  4. रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी व ग्लिसरीन लावून झोपायला पाहिजे. हात-पाय मऊ व चकचकीत होतात. 
  5. दुधात 2 बदाम भिजवून त्याची सालं काढून वाटून घ्यावे आणि थोडंसं संत्र्याचा रस घालून हात-पाय व चेहऱ्यावर लावावे. 1/2 तासानंतर धुऊन टाकावे. 
  6. पपईचा गर 1/2 तासासाठी चेहऱ्यावर आणि हातावर लावून धुऊन टाकल्याने त्वचा चमकदार बनते. 
  7. टोमॅटो, गाजर व काकडीचा रस हे तिनही सम प्रमाणात घेऊन त्यात 2 लिंबाचा रस टाकून त्याची पेस्ट करून रोज 1/2 तास लावून ठेवावे नंतर थंड पाण्याने धुऊन घ्यावे. 
  8. मधात लिंबाचा रस मिसळून लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.