कोरोनाच्या संकटामुळे जगभरात आर्थिक नुकसानही जास्त प्रमाणात झाले आहे. त्यामध्ये आता एसटीही आर्थिक संकटात सापडली आहे. गेली दोन महिने झाले एसटी कामगारांना वेतन करण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत.
या पार्श्वभुमीवर खाजगी बँकांकडून कर्ज घेण्याची वेळ महामंडळावर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी आहे. दोन महिने पगार न झाल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. या काळात एसटी कामगार आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर येऊन आंदोलन करणार आहे असे एसटी कामगार संघटनेने सांगितले.
राज्य सरकारने सवलत योजनेअंतर्गत 750 कोटी रुपये आतापर्यंत महामंडळाला दिले आहेत. दसरा, दिवाळी सण जवळ आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झालं आहे. त्यात कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन आणि भत्तेही मिळाले नाहीत. या काळात एसटी कामगार आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर येऊन आंदोलन करणार आहेत असे एसटी कामगार संघटनेने सांगितले. त्यांच्या कुटुंबाकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकारने तात्काळ वेतनासाठी पैसे द्यावेत अशी मागणी केली आहे.