‘दिल्या घरी सुखी रहा’ राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांची घरवापसी नाहीच : पवार

23

राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक नेते संपर्कात आहेत. पण, उस्मानाबादमधील सोडून गेलेल्यांना आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश नाही. असं म्हणत शरद पवार यांनी हात जोडले आहेत.
शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे डॉ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भाजप प्रवेश त्यांच्या जिव्हारी लागल्याचं स्पष्ट होत आहे.

शरद पवारांनी रविवारी तुळजापूर, लोहारा, उमरगा, उस्मानाबाद तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. आणि सदरील भागाची पाहणी केली. तुळजापुरात अधिकाऱ्यांकडून नुकसाभरपाईचा आढावा घेतला. सोमवारी तुळजापूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी सोडून गेल्यानंतर आता पुन्हा त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देणार नसल्याचं त्यांनी हात जोडून म्हटलं आहे. दिल्या घरी सुखी रहा असं स्पष्ट विधान त्यांनी केलं.

काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. खडसेंनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. याबाबत शरद पवार यांनी सूचक विधान केलं. भाजपाने सर्वाधिक प्रभावी असलेल्या खडसेंची पाहिजे तशी नोंद घेतली नाही. मात्र राजकीय निर्णय काय घ्यावा? हा त्यांचा प्रश्न आहे, अशा शब्दांत पवारांनी आपली भावना व्यक्त करीत असतानाच खडसे यांच्या कामाचे कौतूकही केले.