दिवाळीनंतर होणार टप्याटप्याने शाळा सुरू; वर्षा गायकवाड

25

राज्यात कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. दिवाळी नंतर राज्यातील शाळा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आता लवकरचं उघडणार आहेत.

नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष आहेत त्यामुळे त्यांचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. त्यानंतर इतर सर्व वर्ग टप्याटप्याने सुरू होतील. सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा एकत्र सुरू केल्या तर विद्यार्थ्यांना हानी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे.

राज्य सरकारने नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 50% शिक्षकांची उपस्थित ही अनिर्वाय आहे. आरोग्य विषयक सर्व सूचनांचे व खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरचं बैठक घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेतील, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.