देवेद्र फडणवीस अडचणीत ? जलयुक्त शिवार योजनेची होणार SIT चौकशी

33

जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या खर्चावर कगने आक्षेप घेतल्यानंतर आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणाची ओपन चौकशी होणार असल्याने भाजपाने घाबरून जाऊ नये असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

कॅगने जलयुक्त शिवार योजनेच्या काही त्रुटींवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खुली चौकशी करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. या चौकशीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. या योजनेवर कॅगने ताशेरे ओढल्यानंतरही चौकशी नाही केली तर जनता आम्हाला जाब विाचरेल. त्यामुळे चौकशी करणे गरजेचं आहे. ही चौकशी होत असल्याने भाजपने नाराज होऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये, असा चिमटाही त्यांनी काढला. जलयुक्त शिवाराबाबत फडणवीसांचं सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे की कॅगचं सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

योजनेत अनेक त्रुटी असून या योजनेच्या खर्चावरही कॅगने ताशेरे ओढले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चौकशीच्या फेऱ्या अडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपला टोले लगावले.