“देशातील सध्याची स्थिती बघता आणीबाणीपेक्षाही भयानक, त्यामुळे गांधींना माफी मागण्याची गरज नाही” काय म्हणाले संजय राऊत?

6

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काहीदिवसांअगोरद ईंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयावरुन विधान केलं होतं. ईंदिरा गांधी यांचा आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता. असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. या विधानावरुन राजकारणसुद्धा तापलं होतं. परंतू शिवसेना खा. संजय राऊत यांनी राहुल गांधींना आजीच्या त्या कृत्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, असे म्हणत केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. सामनाच्या रोखठोक सदरात याबाबात त्यांनी लिखान केले आहे.

आणीबाणी हा कालबाह्य विषय आहे. पुन:पुन्हा तेच दळण का दळायचे? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. आणीबाणीच्या निर्णयामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला आणि नंतर माफ करत सत्तेतसुद्धा आणले. असेही राऊत यांनी म्हटले आहे.

“आजची देशाची परिस्थिती बघता, आणीबाणी बरी होती असे म्हणने योग्य ठरेल. अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह चार जणांवर आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त आहे. हे चौघेजण देशातील सद्यस्थितीवर खुलेपणाने बोलतात. केंद्र सरकारवर टीकाही करतात. या चार जणांवरच अायकर विभागाच्या धाडी पडल्या, म्हणजे बॉलिुवुडमधील हे चार जण सोडून सगळे साव आहेत.” असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक लिखान शैलीतून केंद्र सरकारला टोले लगावले आहे.

“आणीबाणी म्हणजे लोकशाही रुळावरुन घसरली होती” असे वर्णन खुद्द ईंदिरा गांधींनीच केले होते. आणीबाणीबद्दल ईंदिरा गांधी यांनी जाहीरोणे खेद व्यक्त केला आहे. जनतेनी त्यांना तसा धडाही शिकवला. मात्र तीन वर्षातच त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा सत्तेत अाणले. जनतेनीसुद्धा त्यांना तेव्हाच माफ केले होते. त्यामुळे आणीबाणीचा विषय आता काढून राहुल गांधी यांना आपल्या आजीच्या कृतीची माफी मागण्याची काही आवश्यकता नाही. असेसुद्धा संजय राऊत यामध्ये म्हणाले.