धक्कदायक! हाथरसमध्ये दंगल घडवण्यासाठी आला मॉरिसशमधून पैसा

18

उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहे. ED च्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून हाथरसमध्ये झालेल्या घटनेचा राजकिय लाभ घेण्यासाठी परदेशात फंडींग झाल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाजवळ (पीएफआय) ५० कोटी आले होते, असा खुलासा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सुरुवातीच्या अहवालावरून समोर येत आहे. तसेच, हा सर्व निधी १०० कोटींपेक्षा जास्त होता, असा दावा ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हाथरस घटनेनंतर जातीय दंगली पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मेरठ येथून अटक करण्यात आली आहे. हे चौघेही दिल्लीहून हाथरसच्या दिशेने जात होते. यापैकी एक जामियाचा विद्यार्थीही आहे. युपीमध्ये दंगलीचा कट रचणारा पीएफआयचा मास्टरमाइंड आहे, असल्याचा पोलिसांनी केला आरोप आहे. यापूर्वी, यूपी पोलिसांनीही वेबसाइटच्या माध्यमातून दंगलीच्या कट रचल्याचा दावा केला आहे.