पन्हाळा तालुक्यातील नणूंद्रे गावात धक्कादायक घटना घडली आहे. प्राजक्ता सुरेश बाउचकर (वय20) या तरुणीने अश्लील शिवीगाळ व विनयभंग झाल्याने तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.
23 ऑक्टोम्बर रोजी दुपारी प्राजक्ता कोलोली-तेलवे मार्गावरून दुचाकीवरून नणूंद्रे गावी जात होती. अजित पाटील, अक्षय चव्हाण आणि प्रदीप पाटील हे तिघेही प्राजक्ताला वारंवार त्रास देत होते. यावेळी वाटेत अडकून या तिघांनी तिचा विनयभंग करत अश्लील शब्दाचा वापर केला. तिच्या मोबाईलवर चूकीचे मेसेज पाठवले. हा प्रकार तिला सहन न झाल्याने सायंकाळी तिने तणनाशक औषध पिले. कुटुंबायांनी तिला कोल्हापूरात खाजगी रुग्णालयात नेले. तिच्या उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.
हि घटना गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी संतप्त जमावाने संशयितांच्या घरी जाणून नासधूस केली. त्यामुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. याप्रकरणी प्राजक्ताची आई वैशाली बाऊचकर यांनी पन्हाळा पोलिसांत तक्रार केली. संशयित आरोपीपैकी एकाने किटनाशक प्राशन केल्याने त्याच्यावरही उपचार चालू आहेत. अक्षय चव्हाण आणि प्रदीप पाटील यांना अटक करण्यात आली आहे.