समजा माध्यमे ही व्यक्त होण्यासाठी खुलं व्यासपीठ असले तरी अनेकदा त्याचा दुरूपयोग होत असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. असाच काहीसा प्रकार चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेद्रसिंग धोनी यांच्या बाबतीत घडला होता. युएई मध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत धोनीच्या संघाला विशेष छाप पाडता आली नाही. त्यामुळे धोनी आणि चेन्नई संघावर टिका केली जात आहे.
मात्र, ही टीका करत असताना अनेकांनी मर्यादा ओलांडल्याचं स्पष्ट झालं होतं. एका माथेफिरुने तर चक्क धोनीची मुलगी जिवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अशा व्यक्तींना आवर घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी या माथेफिरूचा शोध घेतला असून त्याला गुजरातमधील कच्छमधून अटक करण्यात आली आहे.